पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे येथे अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती केली जाणार आहे. यात प्रत्येक महिन्याच्या दर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता मुलाखत घेतली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीचा पत्ता : आरोग्य विभाग, शिवनेरी सभागृह, चौथा मजला, पुणे
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट
http://www.punecorporation.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.