पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. कारण, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी येथे डॉक्टर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला जळगाव येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : डॉक्टर.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : दीपनगर, जळगाव.
– शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.
– वेतन / मानधन : 2000 प्रतिदिवस.
– वयोमर्यादा : 24 – 55 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 27 सप्टेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई–मेल पत्ता : cegenbhusawal@mahagenco.in
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 08 ऑक्टोबर 2024 सकाळी साडेअकरा वाजता.
– मुलाखतीचा पत्ता : मुख्य अभियंता (संवसु), यांचे यांचे कार्यालय, शक्तीगड, महानिर्मिती, , भु. औ.वि. केंद्र, दीपनगर.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mahatransco.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.