पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता केंद्रीय विद्यालय लातूर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
केंद्रीय विद्यालय लातूर येथे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक आणि विशेष शिक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला लातूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक आणि विशेष शिक्षक.
– नोकरीचे ठिकाण : चाकूर, लातूर.
– शैक्षणिक पात्रता : बी.ए. किंवा बी.एड., डिप्लोमा इन एलिमेंटरी चाइल्ड एज्युकेशन किंवा एनसीटीई, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा/प्रमाणपत्र/बी.एड. विशेष शिक्षण आणि संगणक ज्ञान.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 02 ऑगस्ट 2024.
– मुलाखतीचा पत्ता : पीएम श्री केंद्रीय विद्यालय, एसटीसी, बीएसएफ, चाकूर, लातूर (महाराष्ट्र) ४१३५१३.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://bsfchakur.kvs.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.