पुणे : चांगली नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही आहात? तर ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’, मुंबई येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, अनेक पदांवर भरती केली जात आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’, मुंबई येथे प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यामध्ये काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2025 असणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी sric.tech@iimmumbai.ac.in आणि raufiqbal@iimmumbai.ac.in यावर मेल अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://iimmumbai.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.