पुणे : पुण्यातील CSIR-नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे रिक्त पदावर भरती केली जाणार आहे. त्यानुसार, आता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. कारण, या ठिकाणी काही रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन अर्थात घरबसल्या अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 42 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
CSIR-नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे वरिष्ठ प्रकल्प सहयोगी या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2024 ही असणार आहे. यामध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या प्रकियेंतर्गत केवळ एक रिक्त पद भरले जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ प्रकल्प सहयोगी.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 42,000+ HRA.
– वयोमर्यादा : 40 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ncl-india.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.