पुणे : चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील भारती विद्यापीठ येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठ येथे अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 9 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक.
– एकूण रिक्त पदे : 24 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 26 मे 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जून 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता (हार्ड कॉपी) : सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल. बी. एस. मार्ग, पुणे ४१११०३०.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://bvp.bharatividyapeeth.edu/ वरून माहिती घेता येणार आहे.