पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, शिक्षक/प्रदर्शक आणि कनिष्ठ निवासी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
या प्रक्रियेंतर्गत एकूण 46 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. 9, 23, 30 ऑगस्ट 2024 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011 येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://bavmcpune.edu.in/अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.