पुणे : पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी आणि शिक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 47 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 64,551 ते 1,80,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://bavmcpune.edu.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
या पदांसाठी मुलाखत येत्या सोमवारी अर्थात 23 सप्टेंबर रोजी घेतली जाणार असून, त्यासाठी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011 येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे.