पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्रात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्रात तंत्रज्ञ/बी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.barc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : तंत्रज्ञ/बी
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 11,730/-.
– वयोमर्यादा : 50 वर्षे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 08 ऑगस्ट 2024.
– मुलाखतीचा पत्ता : कॉन्फरन्स रूम नंबर 2, तळमजला, बीएआरसी हॉस्पिटल लायब्ररीच्या मागे, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094.