पुणे : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जवळपास सर्वांनाच सरकारी नोकरी मिळावी असे वाटत असते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मध्ये रिक्त पदावर भरती केली जात आहे.
‘रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ येथे अतिथी व्याख्याता (गेस्ट लेक्चरर) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अतिथी व्याख्याता.
– एकूण रिक्त पद : 1 पद.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई
– वेतन / मानधन : दरमहा 1,00,000 ते 2,80,000 रुपयांपर्यंत.
– वयोमर्यादा : 58 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 21 मार्च 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 दिवसांच्या आत.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कॉर्पोरेट ऑफिस / RCIL, पूर्व किडवाई नगर, नवी दिल्ली.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.railtelindia.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.