Job News मुंबई : भारतीय रेल्वे विभागात नोकरी करता यावी असे अनेकांचे स्वप्न असते. पण आता हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. (Job News) कारण रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. (Job News दक्षिण मध्य रेल्वेत या पदांसाठी ही भरती होणार आहे. (Job News यासाठी तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे.(Job News
भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वेने कनिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक या पदासाठी ही भरती सुरु केली आहे. या पदांसाठी अर्ज करता येईल. ही अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन आहे. पात्र उमेदवारांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या scr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून, 2023 पर्यंत आहे.
एकूण पदे किती?
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. एकूण 35 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कनिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक या अंतर्गत ही भरती होईल.
या पदांसाठी भरती –
सिव्हिल इंजिनिअरिंग – 19 पदे
इलेक्ट्रिकल (ड्रॉईंग) – 10 पदे
एस अँड टी (ड्रॉईंग) – 6 पदे
काय असेल पात्रता?
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्जदारांकडे संबंधित विषयाची पदवी असावी. याशिवाय उमेदवारांकडे मॅकेनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही पदविका, डिप्लोमा असावा. तसेच सर्वसाधारण गटातील उमेदवारांकडे 60 टक्के गुण असावेत. तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती?
वयाची मर्यादा
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे त्यांच्या श्रेणीनुसार वय निश्चित करण्यात आले आहे. सर्वसाधारण, खुल्या गटातील उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे असावे. तर ओबीसी प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 36 वर्षे, एससी/एसटीसाठी 38 वर्षे वयोगट आहे.
किती असेल अर्ज शुल्क?
सर्वसाधारण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करताना 500 रुपये शुल्क तर एससी/एसटी/ओबीसी/महिला/अल्पसंख्यक/ईडब्ल्यूएस श्रेणी या उमेदवारांना अर्जासोबत 250 रुपयांचे शुल्क अदा करावे लागणार आहेत.