नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यातच आता शिक्षण विभागात मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत कनिष्ठ मूलभूत शिक्षकांची सुमारे 300 पदे भरली जाणार आहेत.
चंदीगड प्रशासन विभागात कनिष्ठ मूलभूत शिक्षक पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार chdeducation.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 31 ऑगस्टपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.
कनिष्ठ मूलभूत शिक्षक भरती मोहिमेअंतर्गत एकूण 293 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 37 वर्षे दरम्यान असावे.
अर्ज शुल्क किती?
अनारक्षित आणि इतर श्रेणीतील अर्जदारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी श्रेणीतील उमेदवारांसाठी 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
काय आहे शैक्षणिक पात्रता?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समतुल्य आणि NCTE द्वारे मान्यताप्राप्त किमान 2 वर्षे कालावधीचा प्राथमिक शिक्षण (D.E.Ed.) डिप्लोमा असणे आवश्यक आहे. किमान 50 टक्के गुणांसह पदवी आणि शिक्षण पदवी (B.Ed.) असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज…
– सर्वप्रथम chdeducation.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– मुख्यपृष्ठावरील भरती टॅबवर जा.
– ज्युनियर बेसिक टीचर ऍप्लिकेशन लिंकवर क्लिक करा.
– नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा.
– अर्ज भरा, अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
– अर्ज भरून झाल्यानंतर त्याची प्रिंटही काढा.