पुणे : चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जातात. त्यात विविध परीक्षा, मुलाखती दिल्या जातात. पण तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही चांगल्या नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, पुणे महापालिकेत आता नोकरी मिळू शकणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. पुणे महापालिकेत जिल्हा पी.पी.एम समन्वयक, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (एस.टी.एस.), टीबी हेल्थ व्हिजिटर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 असणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी ‘इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी, पुणे महानगरपालिका, शहर क्षयरोग केंद्र, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र (गाडीखाना), ६६६ शुक्रवार पेठ, मंडई जवळ, शिवाजीरोड, पुणे-411 002 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.