Job News, नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तयारीत असलेल्या तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राजस्थान उच्च न्यायालयात स्टेनोग्राफरच्या अनेक पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तर अर्जाची प्रक्रिया 1 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणार आहे. (Job News)
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 1 ऑगस्टपासून अधिकृत वेबसाइट hcraj.nic.in वर अर्ज करू शकतात. स्टेनोग्राफर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट, 2023 सायंकाळी पाचपर्यंत सुरू राहणार आहे. (Job News)
अशी असेल भरती प्रक्रिया..
एकूण पदे किती?
या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 277 पदे भरली जाणार आहेत.
वयोमर्यादा किती?
18 ते 40 वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाची कला, विज्ञान किंवा वाणिज्य या विषयातील उच्च माध्यमिक परीक्षा किंवा सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष परीक्षा किंवा कोणतीही उच्च परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच देवनागरी लिपी आणि राजस्थानी बोलीमध्ये लिहिलेल्या हिंदीचे चांगले ज्ञान असावे.
अर्ज शुल्क किती?
सामान्य गट / ईबीसी (क्रिमीलेयर) / ओबीसी (क्रिमीलेयर) / इतर राज्य अर्जदारांना 700 रुपये शुल्क भरावे लागेल, तर ईबीसी (नॉन-क्रिमी लेयर) / ओबीसी (नॉन-क्रिमी लेयर) साठी 550 रुपये शुल्क आहे. EWS श्रेणीतील उमेदवार, SC/ST/PWD श्रेणीतील अर्जदारांना 450 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
दरम्यान, या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी hcraj.nic.in या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन माहिती घेता येऊ शकेल.