पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यामध्ये रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 18 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे समुपदेशक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : समुपदेशक.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक, विभागीय कार्यालय, समर्थ नगर, पारगावकर दवाखान्या समोर, छत्रपती संभाजीनगर 431001.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.msrtc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.