Job News मुंबई : सरकारी नोकरी असावी असे अनेकांचे स्वप्न असते. काहींचे स्वप्न पूर्ण होते तर काहींना अडचणी येतात. (Job News) पण आता पुन्हा एकदा सरकारी नोकरीसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. (Job News) IBPS RRB विभागात 8594 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. (Job News)
यामध्ये ऑफिसर स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), ऑफिसर स्केल -II (कायदा), कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), ऑफिसर स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल -II (कृषी अधिकारी), ऑफिसर स्केल -II (पणन अधिकारी), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), ऑफिसर स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) या पदांसाठी ही भरती असणार आहे.
कसा करावा अर्ज –
पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीनं अर्ज शकणार आहेत. अर्ज करण्यासाठीची 21 जून 2023 ही शेवटची तारीख असणार आहे.
पदसंख्या किती?
या भरती प्रक्रिया अंतर्गत 8594 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि इतर अर्हता –
ऑफिसर स्केल – I (AM): मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे.
ऑफिस असिस्टंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे.
जनरल बँकिंग ऑफिसर (व्यवस्थापक) स्केल – II: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे. इतर पदांच्या पात्रतेबाबत अधिकृत संकेस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
अशी होणार निवड
प्राथमिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा होणार आहे. त्यात उत्तीर्ण झालेले उमेदवारांची सामान्य मुलाखत घेण्यात येणार आहे.