Job News नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओमध्ये मोठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत अनेक पदे भरली जाणार आहेत. स्टेनोग्राफर (गट C) या पदासाठी भरती केली जाणार आहे. (Job News)
परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांच्या परीक्षेबाबत माहिती मिळवता येईल. EPFO भरतीत एकूण 2859 पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी 185 रिक्त पदे स्टेनोग्राफर (गट C) आणि 2674 सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदासाठी आहेत.
ईपीएफओ स्टेनोग्राफरची परीक्षा एक ऑगस्ट रोजी होणार आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी लागणारी पात्रता, पगार, वयोमर्यादा या संदर्भात माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन घेता येऊ शकेल.
कसा करावा अर्ज…
– सर्वप्रथम recruitment.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
– मुख्यपृष्ठावरील ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची भरती चाचणी’ या लिंकवर क्लिक करा.
आता ‘Exam City Intimation for Stenographer (Group-C)’ वर क्लिक करा.
– तुमचा अर्ज तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– शहराची माहिती स्लिप स्क्रीनवर दिसेल.
– ते पाहा आणि डाउनलोड करा.