Job News : नवी दिल्ली : सरकारी बँकेत नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक अशी ओळख असलेल्या भारतीय स्टेट बँकेत (SBI) ही भरती केली जाणार आहे. बँकेत सेवानिवृत्त बँक अधिकारी पदांसाठी भरती केली जात आहे. त्यासाठी कोणतीही परीक्षा नसणार आहे.(Job News)
सरकारी बँकेत नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
स्टेट बँकेत एकूण 194 रिक्त जागांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये काउंसलरची 182 पदे तर डायरेक्टरसाठी 12 पदांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया 15 जून 2023 पासून सुरु झाली असून, पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जुलै ही असणार आहे.(Job News)
पात्रता काय?
काउंसलर आणि डायरेक्टर म्हणून लोकांना वित्तीय संस्थांशी संबंधित मुद्द्यांवर काउंसलिंग कसे करावे, हे माहित असले पाहिजे. तसेच प्रादेशिक भाषेचे ज्ञान असावे.
वयोमर्यादा
पात्र उमेदवाराचे वय 60 ते 63 वर्षे दरम्यान असणं गरजेचे आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया…
या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. अर्जांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
पगार किती?
या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना 35 हजार ते 60 हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाणार आहे. दरम्यान, याबाबतची सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.(Job News)