पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 24 एप्रिल, 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
ठाणे महानगरपालिकेत वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS), क्षयरोग आरोग्य अभ्यागत (TBHV) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 3 रिक्त पदे भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, चौथा माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) – 400602 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS), क्षयरोग आरोग्य अभ्यागत (TBHV).
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : ठाणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 एप्रिल 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, चौथा माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)-400602.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://thanecity.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.