पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपूर वन विभागात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 7 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

वन विभाग, नागपूर येथे मानद वन्यजीव रक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरले जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी dycfnagpur@mahaforest.gov.in या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मानद वन्यजीव रक्षक.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 26 मार्च, 2025
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 एप्रिल 2025
– अर्ज पाठवण्याचा ई–मेल पत्ता : dycfnagpur@mahaforest.gov.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.mahaforest.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.







