पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, महात्मा फुले कृषि विद्यापीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहिल्यानगर येथे कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अहिल्यानगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत सात रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यापीठ अभियंता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी-413722 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य).
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर (अहमदनगर).
– शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा.
– वेतन / मानधन : दरमहा 25000 रुपयांपर्यंत.
– वयोमर्यादा : 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 एप्रिल 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://mpkv.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.