Job News : नवी दिल्ली : एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2023 साठी कर्मचारी निवड आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), एआयए, एसएसएफ आणि रायफलमन (जीडी) साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. ही प्रक्रीया 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल. यासाठी तुम्ही एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर रजिस्ट्रेशन करू शकतात.
रजिस्ट्रेशन 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाल्यानंतर 29 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. फी भरण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे. या पदांच्या भरतीसाठी परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये घेतली जाईल. परीक्षा सीबीटी पद्धतीने हिंदी आणि इंग्रजी भाषेत घेतली जाईल. सीबीटी परीक्षेतील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण वजा केले जातील.
कोणत्या विभागात किती पदे?
एनआयए – २२५ पदे
एसएसएफ – ५८३ पदे
आयटीबीपी – ३००६ पदे
एआर – ४७७६ पदे
एसएसबी – ५२७८ पदे
सीआयएसएफ – ८५९८ पदे
बीएसएफ – २७८७५ पदे
सीआरपीएफ – २५४२७ पदे
असा करता येईल अर्ज :
– एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.
– होमपेजवर दिलेल्या लॉग इन टॅबवर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन करा.
– आता संबंधित भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात करा.
– कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क जमा करा.
– आता सबमिट करा.
वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे.
पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेले तरुण या सर्व पदांसाठी अर्ज करू शकतात.
अर्जाचे शुल्क – एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2023 परीक्षेसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) च्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया – सीबीटी परीक्षा आणि इतर परीक्षांद्वारे अर्जदारांची निवड केली जाईल. परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना पीईटीसाठी बोलावले जाईल. सीबीटी परीक्षेसाठी सर्व यशस्वी अर्जदारांना आयोगाकडून प्रवेशपत्र जारी केले जाईल. निवड प्रक्रियेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी इत्यादींमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी नियुक्त केले जाईल.