Job News मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण बँकांची बँक अशी ओळख असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. (Job News) आरबीआयने मुंबईतील विविध ठिकाणच्या कार्यालय आणि बँकांमधील कामासाठी तब्बल 66 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. (Job News)
आरबीआयमध्ये विविध पदांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये वरिष्ठ विश्लेषक, विश्लेषक, डेटा वैज्ञानिक, आयटी प्रकल्प प्रशासक, नेटवर्क प्रशासक, डेटा अभियंता, आयटी सुरक्षा तज्ञ, आयटी सिस्टिम प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक आणि सल्लागार अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.
अशी आहे अर्ज प्रक्रिया…
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा स्वतंत्रपणे विहित करण्यात आली आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर व्हिजिट करून माहिती मिळवता येऊ शकते.
अर्ज कधीपासून उपलब्ध?
या सर्व पदांसाठी 21 जून 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय?
आरबीआयमध्ये नोकरीस इच्छुक असणारे उमेदवार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. 11 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.
अशी करा नोंदणी :
आरबीआयमध्ये नोकरीस इच्छुक असलेल्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. त्यानंतर, Click Here for New Registration वर क्लिक करावे. त्यानंतर वैयक्तिक माहिती भरून रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.