Job News : पुणे : राज्यात ४६४४ तलाठी पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही पदभरती ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून होणार असून कुठल्याही शाखेतील पदवीधराला यासाठी २६ जून ते १७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. (Job News)
राज्यातील लाखो उमेदवार तलाठी पदाच्या भरतीची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. ३६ जिल्ह्यांसाठी ही जाहिरात असून, उमेदवारांना कुठल्याही जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. सध्या परीक्षेची तारीख ठरली नाही. संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दोनशे गुणांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, ती वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. एकूण गुणांच्या ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक असणार आहे. अर्जदारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. (Job News)
तलाठी भरती प्रक्रिया भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून राबवली जाणार असून, याकरिता भूमी अभिलेख विभागाने टीसीएस या कंपनीची निवड केली असून कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर हे दोन तारखांना परीक्षा घेण्याचे पर्याय देण्यात आले आहेत व तसेच सरकारला देखील कळविण्यात आले. (Job News)
या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्याकरिता स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढणे शक्य नसल्यामुळे संपूर्ण राज्याकरिता एकच प्रश्नपत्रिका काढली जाण्याची शक्यता आहे. लवकरच परीक्षेचा अर्ज नोंदणीसाठी लिंक खुली करण्यात येणार असून, लिंक ओपन झाल्यानंतर २१ दिवसांची मुदत ही अर्ज करण्यासाठी देण्यात येणार आहे. एका जिल्ह्यातून एकाच उमेदवाराला अर्ज भरता येणार आहे. (Job News)
आजपर्यंतच्या तलाठी भरती परीक्षांमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यंदा भूमी अभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम टीसीएस कंपनीला दिले आहे. तलाठी भरतीसाठी घेण्यात येणार्या परीक्षेकरिता अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला असून, संपूर्ण राज्यातील परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. (Job News)
भरती परीक्षेकरिता लिंक ओपन झाल्यावर नोंदणी करता २१ दिवसांचा मुदत कालावधी असणार आहे. राज्यभरातून किमान पाच लाख विद्यार्थी उमेदवार ही परीक्षा देतील, असा अंदाज आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया करून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दिवशी परीक्षा घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.
तलाठी परीक्षेसाठी अर्ज करणार्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये, तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याला ९०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. (Job News)
तलाठी भरतीत अनुकंपाधारकांसाठी २० टक्के जागा राखीव !
राज्यातील नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, पुणे तसेच अमरावती या विभागातील तलाठ्यांच्या ४ हजार ६४४ पदभरतीसाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. १५ जूनपासून प्रक्रिया सुरू होणार असतानाच शासनाने अनुकंपाधारकांची २० टक्के पदे भरण्याचे आदेश दिल्याने आता ही प्रक्रिया लांबणार आहे. या प्रक्रियेत उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार होता. साधारण गटासाठी १ हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार होते. त्यामुळे राज्यातील लाखो उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी लिंक खुली होण्याची प्रतीक्षा लागली होती. तशातच राज्य शासनाचे अनुकंपाधारकांच्या २० टक्के जागा भरण्याचे आदेश दिल्याने आकडेवारी आता आरक्षणनिहाय बदलणार आहे. (Job News)