Job News : नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळण्याची तुमची इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण, पूर्व रेल्वे विभागात तब्बल 3115 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात.
अशी असेल भरती प्रक्रिया…
अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन
एकूण पदसंख्या – 3115 पदे
भरती प्रकार – सरकारी
एकूण पदे – 3115
काय असावी शैक्षणिक पात्रता?
या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यासोबत उमेदवार ITI ही असावा.
वयोमर्यादा काय?
कमीत कमी : 15 वर्षे. तर कमाल वय – 24 वर्षे असावे.
अर्ज शुल्क किती?
Open/OBC/EWS – 100. SC/ST, PWD /Female – कोणतेही अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2023
कुठं करावा अर्ज?
उमेदवारांना अधिकृत वेबसाईट www.er.indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करता येऊ शकणार आहे.