Job News नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण राजस्थान कर्मचारी निवड मंडळात (जयपूर) विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या प्रक्रियेंतर्गत पाच हजारांपेक्षा अधिक पदांची भरती होत आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर ही संधी अखेरची ठरू शकते. Job News
एकूण पदे किती?
या भरती अंतर्गत एकूण 5388 पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यामध्ये कनिष्ठ लेखापालच्या 5190 तर तहसील महसूल लेखापालची 198 पदे भरली जाणार आहेत.
वयोमर्यादा काय?
या पदांसाठी 18 ते 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. 17 सप्टेंबर 2023 रोजी परीक्षा आयोजित केली जाईल.
अर्ज करण्याची अंतिम मुदत –
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 असणार आहे.
अर्ज शुल्क किती?
या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावे लागतील. तर EBC, SC, ST श्रेणीसाठी 400 रुपये शुल्क आहे.
शैक्षणिक पात्रता, इतर बाबींसाठी अधिकृत वेबसाईट sso.rajasthan.gov.in वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.