Job News : पुणे : सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. पण अशाप्रकारे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण वन विभाग चंद्रपूर येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
वन विभाग चंद्रपूर येथे कीटकशास्त्रज्ञ / जीवशास्त्रज्ञ या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी 25 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असणार आहे. केवळ एका जागेसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
पदाचे नाव : कीटकशास्त्रज्ञ / जीवशास्त्रज्ञ.
रिक्त पदे : 1 पद.
नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर
किती मिळू शकतो पगार?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 30,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन आणि ऑनलाईन.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मध्यचांदा वनविभाग, मूळ रोड चंद्रपूर माता मंदिर समोर (442401 ) यांचे कार्यालय
ऑनलाईन ई-मेलच्या माध्यमातून अर्ज कुठं पाठवावा?
ऑनलाईन ई-मेलच्या माध्यमातून अर्ज dycfcentralchanda@mahaforest.gov.in या मेलवर पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2023.
कशी होईल निवड?
या पदांसाठी आवश्यक पात्रता असणाऱ्या उमेदवाराची अंतिम निवड ही मुलाखतीतून केली जाणार आहे.
कुठं मिळेल अधिक माहिती?
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://mahaforest.gov.in/ ला भेट देऊन माहिती घेता येऊ शकेल.