Job News : मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणी आणि महिलांचा शोध आता संपणार आहे. तुम्ही देखील 12 पास असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी ठरू शकते. कारण महाराष्ट्रातील विविध जिल्हाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत असणाऱ्या विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठीची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 480 जागा भरण्यात येणार आहे.(Job News)
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणी आणि महिलांचा शोध आता संपणार आहे.
पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
एकूण पदसंख्या – 480
शैक्षणिक पात्रता – बारावी पास, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
पगार – 5,500 रुपये दरमहा
वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय 18 तर कमाल 35 वर्षे असावे. तर यामध्ये विधवा महिलांसाठी अतिरिक्त पाच वर्षे देण्यात आली आहेत. म्हणजे 40 वर्षे असलेली महिला देखील अर्ज करू शकणार आहे.(Job News)
अर्ज पाठवायचा कुठं?
सदर भरती प्रक्रिया महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. त्यामुळे सातारा, बुलडाणा, अहमदनगर, वाशिम आणि अकोला यासह इतर ठिकाणी असलेल्या कार्यालयात अर्ज पाठवता येणार आहे. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना पाहावी.(Job News)
फक्त महिलाच करू शकणार अर्ज
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 480 अंगणवाडी मदतनीस पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया फक्त तरुणी किंवा महिलांसाठी राबवली जात आहे.(Job News)