Job News : नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 185 मॅनेजमेंट ट्रेनी आणि डिझाइन ट्रेनी पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Job News)
अशी असेल भरती प्रक्रिया…
एकूण किती पदे?
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे मॅनेजमेंट ट्रेनी आणि डिझाईन ट्रेनी पदांसाठी एकूण 185 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 185 रिक्त पदांपैकी 95 पदे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि उर्वरित 90 पदे डिझाइन प्रशिक्षणार्थीसाठी असणार आहेत.
शैक्षणिक पात्रता काय?
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी आणि इतर विहित पात्रता असणे आवश्यक आहे.
कशी असेल निवड प्रक्रिया?
निवडीसाठी ऑनलाइन चाचणी/मुलाखत घेण्यात येईल. ऑनलाइन परीक्षेतील सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, इंग्रजी इत्यादी विषयांमधून प्रश्न विचारले जातील.
वयोमर्यादा किती?
HAL MT, DT भरतीसाठी कमाल वय 28 वर्षे निश्चित करण्यात आले आहे आणि नियमानुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क किती?
SC, ST, PWBD श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 असणार आहे.
अधिक माहितीसाठी आणि या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी hal-india.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.