Job News पुणे : सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नही केले जातात. पण काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. मात्र, आता तुमचा हा शोध संपण्याची शक्यता आहे. कारण, महिला बाल विकास विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला पालघर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. जुडो कराटे प्रशिक्षक, योग प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगार मिळू शकतो. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. जाणून भरतीसंदर्भात संपूर्ण प्रक्रिया…
– पदाचे नाव : जुडो कराटे प्रशिक्षक, योग प्रशिक्षक
– संस्थेचे नाव : महिला व बाल विकास विभाग, पालघर
– मुलाखतीची तारीख : 25 ऑक्टोबर 2023.
– नोकरीचे ठिकाण : पालघर
– अर्ज करायची पद्धत – ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.
– मुलाखतीचा पत्ता : महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, पालघर.
– कुठं मिळेल अधिक माहिती?
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.maharashtra.gov.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.