Job News मुंबई : चांगली नोकरी मिळावी यासाठी सर्वांचाच प्रयत्न असतो. एखाद्या ठिकाणी नोकरीची संधी असल्याचे समजल्यावर ती मिळवण्यासाठी मग धडपड सुरू होते. (Job News) पण नोकरी मिळेल की नाही हे आपण दिलेल्या मुलाखतीतून जवळपास कळून येते. त्यामुळे मुलाखतीला जाताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास त्याचा फायदा होतो. (Job News)
बोलण्यावर नियंत्रण ठेवा
मुलाखतीदरम्यान स्वतःच्या
कामाबद्दल, अनुभवाबद्दल सांगण्याचे अनेक प्रसंग येतील. त्यावेळी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बोलण्याच्या ओघात स्वत:ची प्रशंसा करणे टाळा. जे आवश्यक आहे किंवा जेवढे विचारले जाते तेवढेच बोला. संपूर्ण मुलाखतीत फक्त स्वत:ची स्तुती करू नका.
कंपनीबद्दल सकारात्मक बोला
मुलाखतीदरम्यान तुमची सध्याची कंपनी, बॉस / वरिष्ठ यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातील. अशावेळी त्यांच्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू नका. सध्याच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला त्रास होत असला, तरी मुलाखतीदरम्यान त्याचा उल्लेख करु नका. मुलाखतीत नेहमी सकारात्मक राहिल्याने समोरच्या व्यक्तीवर चांगला परिणाम होतो आणि नोकरी मिळण्याची हमी वाढते.
नीट ऐका मगच उत्तर द्या
मुलाखतकाराने विचारलेले प्रश्न नीट ऐकून घ्या. त्यांचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वी तुमचा मुद्दा सांगण्याची घाई करू नका. यामुळे तुमची छबी खराब होईल. तुम्ही बोलण्यात चंचल राहिलात तर चांगले टीम लीडर म्हणून तुम्ही अयोग्य ठराल. कारण तुम्ही कोणाचेही ऐकू शकत नाही, असे त्यातून दिसू शकते. एक चांगला श्रोता असणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
तुमच्याकडील कौशल्यांचा फायदा सांगा
तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांचा कंपनीला कसा फायदा होऊ शकतो, हे मुलाखत घेणाऱ्याला पटवून द्या. जेणेकरून तुम्हाला नोकरी देण्याबाबत अधिक विचार होऊन तुमची सकारात्मक व्यक्ती अशी छाप पडावी.