नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी बहुतांश जण प्रयत्नही करत असतात. पण आता तुमच्या या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय लष्करात मोठी भरती केली जाणार आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही नोकरी मिळणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार रुपयांपर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय लष्करात ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ (एमटीएस) आणि इतर अनेक अशी एकूण 24 पदे भरली जाणार आहेत. ही भरती लष्कराच्या दक्षिणी कमांड मुख्यालयाने केली आहे. यासाठी आजपासून म्हणजेच 18 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
कोणत्या पदांवर भरती?
एमटीएस (मेसेंजर) साठी 13 जागा, एमटीएस (ऑफिस) साठी 3 रिक्त जागा, कुकसाठी 2 रिक्त जागा आहेत. तर 2 पदे धोबी, 3 मजूर आणि एक माळी अशा पदांवर भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
– 18 सप्टेंबरपासून अर्ज करता येऊ शकणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
– 8 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
काय असावी वयोमर्यादा?
– या भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता काय?
एमटीएस म्हणजेच मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी उमेदवार किमान दहावी पास असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असावा.
किती मिळू शकतो पगार?
सातव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार, एमटीएस पदावर भरती झाल्यानंतर, वेतनश्रेणी स्तर-1, (18000-56900) + भत्ता असेल.
अर्ज कुठं करावा?
– या भरती प्रक्रियेंतर्गत www.hqscrecruitment.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करावा लागणार आहे.