Job News नवी दिल्ली : तुम्हाला भारतीय सैन्यात सरकारी नोकरी करायची असेल तर ही सुवर्णसंधी आहे. लष्कराच्या मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिस (MES) मध्ये 41000 हून अधिक पदांची भरती होणार आहे. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसने या भरतीबाबत एक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये विविध पदांवर 41822 जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये रिक्त जागांवर भरतीसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसने या क्षणी केवळ रिक्त पदांबद्दल माहिती दिली आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. या पदांसाठी अर्जाला सुरुवात, अंतिम तारीख आणि निवड प्रक्रियेसह इतर महत्त्वाची माहिती लवकरच देण्यात येईल, असे सांगण्यात आले. यासाठी स्वतंत्र तपशीलवार अधिसूचना जारी केली जाईल, असेही म्हटले आहे.
कोणत्या पदांची भरती केली जाईल?
इंडियन मिलिटरी सर्व्हिसमध्ये पर्यवेक्षक, ड्राफ्ट्समन, स्टोअरकीपर या पदांवर भरती होणार आहे.
पद आणि रिक्त पदांचा तपशील
वास्तुविशारद संवर्ग गट – 44, बॅरॅक आणि स्टोअर ऑफिसर – 120, पर्यवेक्षक (बॅरॅक आणि स्टोअर) – 534, ड्राफ्ट्समन – 944,
स्टोअरकीपर – 2026, मल्टी-टास्किंग स्टाफ – 11316, MET-27920
इंडियन मिलिटरी सर्व्हिसमध्ये भरती कशी होईल?
इंडियन मिलिटरी सर्व्हिसने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, रिक्त पदांची भरती लेखी परीक्षा, वैद्यकीय तपासणी, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीनंतर केली जाणार आहे.