नवी दिल्ली : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ईएसआयसीने 1038 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ईएसआयसीने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये ऑडिओमीटर टेक्निशियन, डेंटल मेकॅनिक, ईसीजी टेक्निशियन यासह अनेक पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.
पॅरामेडिकल कर्मचारी भरती मोहिमेत 1038 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये दिल्ली एनसीआरमध्ये 275 पदे, उत्तर प्रदेशमध्ये 44 पदे, बिहारमध्ये 64 पदे, राजस्थानमध्ये 125 पदे, मध्यप्रदेशात 13 पदे, झारखंडमध्ये 17 पदे, उत्तराखंडमध्ये 09 पदे, महाराष्ट्रात 71 पदे यासह इतर अनेक पदभरती होणार आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
ऑडिओमीटर टेक्निशियन, डेंटल मेकॅनिक, ईसीजी टेक्निशियन, कनिष्ठ रेडिओग्राफर, कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, फार्मासिस्ट (अॅलोपॅथिक/आयुर्वेद/होमिओपॅथी, सोशलिस्ट/रेडिओग्राफर).
काय असावी शैक्षणिक पात्रता?
ईसीजी टेक्निशियनसाठी विज्ञान विषयासह मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. इतर पात्रतेसंदर्भात अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येऊ शकणार आहे.
अर्ज फी किती?
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD/ESM/महिला/विभागीय कर्मचाऱ्यांना 250 रुपये भरावे लागतील.
कुठं करावा अर्ज?
इच्छुक आणि पात्र उमेदवार esic.gov.in या वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही असणार आहे.