नवी दिल्ली : तुम्हाला सरकारी नोकरी आणि त्यात दरमहा 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळण्याची संधी आहे. कारण अॅग्रीकल्चर सायंटिस्ट रिक्रूटमेंट बोर्ड अर्थात एएसआरबीमध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये अनेक पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 368 पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना asrb.org.in या ASRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या पदांसाठी भरती प्रक्रिया 18 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. ही पदे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रधान शास्त्रज्ञांसाठी आहेत. यामध्ये प्रिन्सिपल सायंटिस्टच्या 80 आणि वरिष्ठ शास्त्रज्ञाच्या 288 पदांचा समावेश आहे.
कोण करू शकतो अर्ज?
प्रिन्सिपल सायंटिस्ट या पदासाठी अर्ज करण्यासाठी कमाल वय 52 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्याचवेळी, वरिष्ठ शास्त्रज्ञ पदासाठी अर्ज करण्यासाठी कमाल वय 47 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज फी किती?
अर्ज करण्यासाठी, सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 1500 रुपये शुल्क भरावे लागेल. SC, ST आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अधिक माहितीसाठी asrb.org.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.