Job News नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ अंतर्गत दिल्ली पोलीस उपनिरीक्षक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल या पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 1876 रिक्त पदे भरली जाणार आहेत. (Job News)
अशी असेल भरती प्रक्रिया…
भरती परीक्षा कधी?
या सर्व पदांसाठी भरती परीक्षा ऑक्टोबर 2023 मध्ये घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट द्यावी लागेल.
अर्जाची अंतिम मुदत काय?
अर्ज करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी रात्री 11.00 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइटवरून अर्ज भरता येणार आहे.
वयोमर्यादा काय?
1 ऑगस्ट 2023 रोजी अर्जदाराचे वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत लागू.
एकूण जागा किती?
या भरती अंतर्गत एकूण 1714 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 109 तर महिला उमेदवारांसाठी 53 जागांवर अधिकारी पदासाठी भरती केली जाणार आहे. उर्वरित जागा या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलासाठी असणार आहेत.
कोण अर्ज करू शकतो?
दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क किती?
उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) च्या उमेदवारांना शुल्कात सूट देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी…
ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.