पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, कोल्हापूर महानगरपालिकेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेत जीवरक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी आजपासून अर्ज करण्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे मैदानासमोर, कोल्हापूर येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://kolhapurcorporation.gov.in/अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : जीवरक्षक.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 11,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 27 सप्टेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे मैदानासमोर, कोल्हापूर.