पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण आता भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. यात 65 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
मध्य रेल्वे विभागात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. होमिओपॅथिक सल्लागार आणि आयुर्वेदिक सल्लागार या पदावर ही भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला भुसावळ येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. उमेदवाराला दरमहा 37,500 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : होमिओपॅथिक सल्लागार आणि आयुर्वेदिक सल्लागार.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : भुसावळ.
– शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा/पदवी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 37,500/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 25 जुलै 2024.
– मुलाखतीची पत्ता : मध्य रेल्वे रुग्णालय, भुसावळ.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.