पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये संबंधित उमेदवाराला घरबसल्या अर्ज करता येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात महाव्यवस्थापक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. महाव्यवस्थापक या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
– पदाचे नाव : महाव्यवस्थापक.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए. पदवी, सामान्य व्यवस्थापनात प्रगत डिप्लोमा.
– वेतन / मानधन : दरमहा 76,600 रुपयांपर्यंत.
– वयोमर्यादा : 25-40 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 25 जून 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जुलै 2024.