Job Update: पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण ‘टाटा मेमोरियल सेंटर’, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती केली जात आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून, या अंतर्गत 50 रिक्ते पदे भरली जाणार आहेत.
‘टाटा मेमोरियल सेंटर’ येथे अटेंडंट आणि ट्रेड हेल्पर पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या पदासाठी 17 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 18 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
अशी असेल भरती प्रक्रिया…
कुठं निघाली भरती – टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई.
पदाचे नाव : अटेंडंट आणि ट्रेड हेल्पर
एकूण रिक्त पदे : 50 पदे.
नोकरीचे ठिकाण : मुंबई.
वयोमर्यादा : कमाल वय 25 वर्षे.
वेतन / मानधन : रु. 18000/- (स्तर 1, सेल क्रमांक 1) + भत्ता
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2023.
कुठं मिळेल अधिक माहिती?
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून घेता येऊ शकणार आहे.