Job Alerts: पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता सोलापूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये तब्बल 226 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला 1.77 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.
सोलापूर महानगरपालिकेत पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशामक अधिकारी / अधिक्षक अग्निशामक दल, पशु शल्य चिकित्सक / पशू वैद्यकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक, जीवशास्त्रज्ञ गट-ब, क्रीडाधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, समाज विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ अभियंता (आटोमोबाईल ), कनिष्ट अभियंता (विद्युत), सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी यांसह इतर अनेक पदे भरली जाणार आहेत.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सोलापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय उमेदवारासाठी १८ ते ४३ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यात अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.solapurcorporation.gov.in/ वर जाऊन भेट देऊन माहिती घेता येणार आहे.