पुणे : तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा, नवी मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा, नवी मुंबई येथे साइट अभियंता (पूल/सिव्हिल/ट्रॅक), विभाग अभियंता (काम), डिझाइन अभियंता (सिव्हिल), गुणवत्ता आश्वासन / कंट्रोल मॅनेजर (सिव्हिल), टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल), साइट सर्व्हेअर (सिव्हिल), साइट इंजिनीअर (एस अँड टी), सेक्शन इंजिनीअर (इलेक्ट्रिकल), डिझाईन इंजिनीअर (इलेक्ट्रिकल), सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 67 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : गुणवत्ता अभियंता (साइट प्रभारी), साइट अभियंता (पूल), साइट अभियंता (ट्रॅक), साइट अभियंता (सिव्हिल), साइट इंजिनीअर (ओएचई/ पॉवर), सहाय्यक विभाग अधिकारी (वित्त) , साइट अभियंता (पॉवर) यासह इतर अनेक पदे
– एकूण रिक्त पदे : 67 पदे.
– नोकरीचे ठिकाण : तारापूर, नवी मुंबई आणि इतर.
– शैक्षणिक पात्रता : बॅचलर डिग्री किंवा डिप्लोमा.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 17,853 /- ते रु. 2,40,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 02 एप्रिल 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.rites.com/ वरून माहिती घेता येणार आहे.