पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे येथे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही एमबीबीएस असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जानेवारी 2024 असणार आहे. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, 4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद, पुणे येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.punecorporation.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.