Job Alert: पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, गोंदिया येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, गोंदिया येथे लोकपाल या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला गोंदिया येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लोकपाल.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : गोंदिया.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 45,000/-.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 30 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 फेब्रुवारी 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप जिल्हाधिकारी (रोहयो), पहिला मजला, खोली क्रमांक-८, पतंगा मैदान, आमगाव रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया-४४१६०१.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://gondia.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.