पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, वाशिम जिल्हा परिषदेत विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
वाशिम जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला वाशिम येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 18 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस/बीएएमएस, जीएनएम/बीएससी नर्सिंग.
– एकूण रिक्त पदे : 18 पदे.
– नोकरीचे ठिकाण : वाशिम
– वेतन / मानधन : दरमहा रु. 20,000/- ते रु. 60,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : खुला प्रवर्ग : 21-38 वर्षे, मागासवर्गीय उमेदवार : 21-43 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 फेब्रुवारी 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.zpwashim.in/ वरून माहिती घेता येणार आहे.