पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, लातूर शहर महानगरपालिका येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
लातूर शहर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी, वित्त आयोग (पॉलीक्लिनिक) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला लातूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 82 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी, वित्त आयोग (पॉलीक्लिनिक).
– एकूण रिक्त पदे : 82 पदे.
– नोकरीचे ठिकाण : लातूर.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, पदवीधर,जीएनएम/ बी.एससी नर्सिंग, बारावी पास, एमडी, एमएस.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 18,000/- ते रु. 75,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 65–70 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 15 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024.
– अर्ज सादर करण्याचा पत्ता : नागरी सुविधा केंद्र विभाग, महानगरपालिका, लातूर.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाईट https://latur.gov.in/en/ वरून घेता येणार आहे.