पुणे : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेबाबतची जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक (कायदा) पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, 19 जून 2024 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर वारंगा, PO: डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – ४४१ १०८ येथे ही मुलाखत घेतली जाणार आहे. कायद्यातील पदव्युत्तर पदवी यासाठी गरजेची असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.nlunagpur.ac.in/ वरून माहिती घेता येणार आहे.