पुणे : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनो ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, कर्मचारी राज्य विमा निगम, पुणे (ESIC) येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कर्मचारी राज्य विमा निगम, पुणे येथे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 23 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 23 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस.
– वयोमर्यादा : 69 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : establishpune.amo@gmail.com
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 27 फेब्रुवारी 2024.
– मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे-411037
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट
http://ww.esic.nic.in/ वरून माहिती घेता येणार आहे.