पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 21 एप्रिला, 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई येथे सहाय्यक माहिती तंत्रज्ञान अधिकारी, माहिती तंत्रज्ञान अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्प, चौथा मजला, गाला अल्टेझा इमारत, उद्योग नगर, ई, प्लॉट नं. 17 ए, फ्लॅक रोड, षन्मुखानंद नाट्यगृहाशेजारी, सायन, मुंबई 400 022 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक माहिती तंत्रज्ञान अधिकारी, माहिती तंत्रज्ञान अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : सहाय्यक माहिती तंत्रज्ञान अधिकारी : ६९४८०, माहिती तंत्रज्ञान अधिकारी : मानधन ७५२४०
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 एप्रिल, 2025.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.sra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.