पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नांदेडच्या केंद्रीय विद्यालयात नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे.

केंद्रीय विद्यालय, नांदेड येथे पीजीटी, टीजीटी, संगणक प्रशिक्षक, पीआरटी, क्रीडा प्रशिक्षक, नर्स, विशेष शिक्षक आणि समुपदेशक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नांदेड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पद भरले जाणार आहे.
संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय विद्यालय SCR नांदेड. डीआरएम कॅम्पस, गेट नंबर 4, एअरपोर्ट रोड, पो. तरोडा, नांदेड- 431605 येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://scrnanded.kvs.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.







